ती' च्या उत्तराने गाजल्या गजाली, जाणून घ्या काय बोलली ?
पेरूमध्ये सुरू असलेली ‘मिस पेरू २०१८’ ही स्पर्धा यावेळी सौंदर्यवतींच्या उपस्थितीमुळे नाही तर वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक सौंदर्यवतीनं आपल्या ‘फिगर’पेक्षा महिलांवर होणाऱ्या ‘अत्याचारांच्या फिगर’कडे जगाचं लक्ष वेधलं. महिलांच्या या उत्तरामुळे जणू प्रत्येकांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातलं गेलं, म्हणूनच या सौंदर्यस्पर्धेत भाग घेणारी प्रत्येक सौंदर्यवती चर्चेचा विषय ठरली.थोडक्यात फॅशन वर्ल्डमध्ये ज्याला ‘फिगर’ असं म्हणतात त्याचा आकडा पुढे येऊन परीक्षकांना सांगायचा असतो. या महिलांनी ‘त्या’ आकड्यांपेक्षा आतापर्यंत देशात किती महिलांवर अत्याचार झाले, याची आकडेवारी समोर ठेवली. देशातल्या किती महिला बलात्कार, अॅसिड हल्ले, घरगुती हिंसाचार, विनभंगाला बळी पडल्या त्याची आकडेवारी प्रत्येक स्पर्धकांनी जगासमोर मांडलीआमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews